गणेशाेत्सव काळात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. याबाबतची माहिती खूद्द एसपी महेंद्र पंडित यांनी माध्यमांना दिली. राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून उत्सव काळात सामाजिक उपक्रम, समाजप्रबोधनपर देखाव्या उभारले जातात. त्यातूनच विविध ठिकाणी उत्कृष्ट देखावा, सर्वोत्कृष्ट गणेशाेत्सव मंडळ यांना विविध संस्था गाैरवितात. दूसरीकडे काही मंडळांकडून माेठ्या माेठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणा लावून नकाे त्या गाण्यांनी भाविकांची निराशा केली जाते.
दरम्यान कोल्हापूरात लेझर शाे (लाईट) वर बंदी घातल्यानंतर काेल्हापूर पाेलीसांनी नृत्यांगणा गाैतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. परंतु त्यास पाेलिसांनी परवानगी नाकारली आहे.
दरम्यान गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर बंदी घातल्याची माहिती खूद्द काेल्हापूरचे पाेलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. पंडित म्हणाले गाैतमी पाटील यांचे जिल्ह्यातील करवीर आणि राधानगरी तालुक्यात कार्यक्रम हाेणार हाेते. त्या कार्यक्रमांना पाेलिस दलाने परवानगी नाकारली आहे.
दरम्यान उत्सव काळात पाेलिसांवर बंदोबस्ताचा ताण असताे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये असे आवाहन देखील जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी केले आहे.