अहमदनगर : प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील तिच्या हटके डान्ससाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरात गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांची गर्दी असते. एका कार्यक्रमाला साधी हजेरी लावली तरी शेकडो चाहते सहज जमतात. याच सेलिब्रिटी डान्सर गौतमी पाटीलला चेहरा झाकून कोर्टात राहावं लागलं आहे. चेहऱ्या स्कार्फ बांधून कोर्टात हजर झालेल्या गौतमी पाटीलला एका जुन्या प्रकरणात जामीन मिळाला.
डान्सर गौतमी पाटील अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आज सोमवारी हजर झाली. चेहरा झाकून गौतमी पाटील नायायलायात आली. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर कार्यक्रम घेतला होता.
विनापरवानगी घेतलेल्या कार्यक्रमामुळे नियमांचं उल्लंघन झालं होतं. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात कोर्टाने गौतमीला कोर्टाने अटी आणि शर्थीनुसार जामीन मंजूर केला आहे.गौतमी पाटीलचे वकील शैलेंद्र शिंदे म्हणाले,’मागील वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकतील कार्यक्रमामुळे गौतमी पाटील विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टाने गौतमी पाटील यांना समन्स दिलं होतं. समन्सनंतर गौतमी पाटील कोर्टात हजर झाली होती. त्यानंतर कोर्टाने गौतमी पाटीलला जामीन मिळाला आहे’.
दरम्यान, पावसाळ्यामुळे गौतमी पाटीलचे खुल्या मैदानातील कार्यक्रम कमी झाले आहेत. मागील महिन्याभरात खुल्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्सचे कार्यक्रम झाल्याची माहिती अद्याप जाहिरात दिसून आलेली नाही. हिवाळा सुरु झाल्यानंतर गौतमी पाटीलचे जाहीर नृत्याचे कार्यक्रम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.