Saturday, December 9, 2023

नृत्यांगना गौतमी पाटील अहमदनगर शहरात, पोलीस प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

नगर-अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाइपलाइन रस्त्यावर मृत्युंजय युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यशोदानगर येथे विहिरीत विसर्जन मिरवणुकीने गणेश मंडळे व नागरिक घरगुती गणेशाचे विसर्जन करतात. तसेच, गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारून प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद नाकाडे (रा. गुलमोहर रोड) व उपाध्यक्ष आकिब शेख (रा. गुलमोहर रोड) यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावली आहे. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत यशोदानगर येथे विसर्जन कार्यक्रम निमित्त नृत्य कलाकर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात परवानगीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारून मृत्युंजय प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नृत्य कलाकर गौतमी पाटील यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d