Thursday, September 19, 2024

नृत्यांगना गौतमी पाटील राजकारणात जाणार ? गौतमी पाटील म्हणाली…

नृत्यांगना गौतमी पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगाने ती अमरावतीत पोहचली आहे. यावेळी तिने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं. अल्पावधीत भरपूर प्रसिद्धी मिळालेली ही नृत्यांगना आहे. गौतमी पाटीलने आत्तापर्यंत विविध शहरांमध्ये कार्यक्रम केले आहेत. सबसे कातील गौतमी पाटील असंही तिला म्हटलं जातं. आता याच गौतमीने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहण्यास मिळतं. तसंच तिच्या कार्यक्रमांची चर्चाही अनेकदा रंगते. कारण त्यात राडाही होतो, कधी खुर्च्याही तुटतात, कधी वादावादीही होते. पश्चिम महाराष्ट्रात गौतमीचे कार्यक्रम जास्त प्रमाणावर होतात. दही हंडीच्या दिवशीही गौतमीचे लावणीचे कार्यक्रम सादर होतात. आता अमरावतीत गौतमी पहिल्यांदाच आली आहे. गौतमी पाटीलची प्रसिद्धी आणि तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे दोन प्रश्न सतत उपस्थित होतात. एक प्रश्न असतो गौतमी पाटीलच्या लग्नाचा आणि दुसरा असतो ती राजकारणात कधी जाणार याचा? आता अमरावतीत पहिल्यांदाच आलेल्या गौतमीने राजकारणात कधी जाणार यावर भाष्य केलं आहे.

राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. मी राजकारणात जाणार नाही. मी कलाकार आहे, मी माझी कला सादर करत असते. राजकारणाशी माझा काही काहीही संबंध नाही आज हे पुन्हा एकदा सांगते मी राजकारणात जाणार नाही. असं गौतमी पाटीलने सांगितलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles