व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीस पाहायला मिळालं आहे. एक तरुण रील्ससाठी धोकादायक स्टंट करताना दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, दृश्य एखाद्या शेतातील आहे असे दिसून येत आहे. एक ट्रॅक्टर रस्त्यावर उभा आहे, तर या ट्रॅक्टरला पाहून तेथे उपस्थित तरुणाला एक रील बनवण्याची कल्पना सुचते. हा तरुण रील बनवण्यासाठी ट्रॅक्टरच्या भल्या-मोठ्या चाकाला पकडून बसतो. तसेच तो एवढ्यावरच थांबत नाही. तरुण ट्रॅक्टरचालकास ट्रॅक्टर सुरू करण्यास सांगतो आणि गिरकीप्रमाणे गोल-गोल फिरू लागतो. ट्रॅक्टरच्या मदतीने रील बनवणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ