पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील बारामती लोकसभेच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळपासून लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत. या मतदानादरम्यान इंदापुरातील दत्ता भरणे यांचा मतदारांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? असे शब्द वापरत दत्ता भरणे हे मतदारांना दमदाटी करताना दिसत आहे. रोहित पवारांनी हा व्हिडिओ ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत आरोप केले आहेत. ‘केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा…विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत…ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024