उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर येवल्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांना पैठणी जॅकेट घालण्यात आले. ते घालून उपमुखमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. “मला पैठणीचं जॅकेट घातले आहे. बायको म्हणेल लग्नात नाही घातले आणि आता घातले. पोरं लग्नाला आली आणि मी जॅकेट घालतोय”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. “नाशिकमध्ये साडेतीन शक्तिपीठपैकी एक शक्तीपीठ आहे. मी देवीला वंदन करतो. येवल्याला बनारस बोलतात. आपल्याला इतिहास आहे. महराजांच्या काळापासून येवलेवाडी स्थापन केली, असे मानले जाते. वीणकरांनी येवल्याचे भविष्य घडविलं म्हणून मी त्यांना सॅल्यूट करतो. रेशीमला पैठणी नाव मिळाले. या येवल्याला मंत्री छगन भुजबळ यांचं नेतृत्व मिळालं आणि या ऐवल्याला गती मिळाली”, असं अजित पवार म्हणाले.