Monday, September 16, 2024

‘मुख्यमंत्री करणार हे आधीच सांगितलं असतं …तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती

विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राजकीय नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले असून कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत आणि उमेदवारांच्या चाचपणी संदर्भात खलबतं सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. असं असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं. “मला सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“माझ्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ साली सुरु झाली. एकनाथ शिंदे यांची टर्म २००४ साली सुरु झाली. या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे. कारण मी १९९० च्या बॅचचा आहे. हे सर्व माझ्या नंतरच्या बॅचचे आहेत. पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. शेवटी ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या वेळेस घडत असतात. मी गंमतीने काहींना म्हणालो की, तुम्ही ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही एवढे आमदार घेऊन आलात तर मुख्यमंत्री करणार, मग मला तसं सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती. शेवटी जे नशीबात असतं तेच होत अ

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles