मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 65 वा वाढदिवस आहे. अजितदादा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी राहून हारतुरे न स्वीकारत न बसता अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवार यांच्यावर आज सकाळपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचे फुल दिले. हेच फूल जॅकेटवर लावून अजित पवार नगरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
अजित पवार यांनी ट्विट करुन सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबाबत सर्वांना सांगितले. मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एरवी अजित पवार हे त्यांचे वैयक्तिक आयुष्याविषयी फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. मात्र, आज पहिल्यांदाच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील केमेस्ट्री जाहीरपणे दिसून आली आहे.
गुलाबी जॅकेटवर सुनेत्रा पवारांनी दिलेलं पांढरं गुलाब, अजितदादांची स्वारी नगरच्या दौऱ्यावर रवाना
- Advertisement -