आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घोषणांचा पाऊस केला जात असतानाच आता या योजनांची परिपूर्ण माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार पासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीयं. वाढदिवसांच्या दिवशीच अजितदादांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात महिलांच्या योजनांबद्दलच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर एका महिलेने प्रश्न विचारला असता. अजित पवारांनी खास उत्तर दिलं.
महिलेने अजितदादांना विचारले होते की, तुम्ही गुलाबी रंगाचे जॅकेट का घालता आहात? त्यावर अजित पवार म्हणाले की, तुम्हीच जशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसता. त्यातील काही साड्या तुम्हाला चांगल्या दिसतात. त्यामुळे तुम्ही त्या आवडीने नेसता. तसेच या रंगाचे जॅकेट मला चांगलं दिसतं. असं काही जणांनी सांगितलं. म्हणून मी ते जॅकेट वापरत आहे. दुसरं काहीही कारण यामागे नाही. असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.