उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर सर्जरी करण्यात आल्यामुळे अजित पवार सिल्व्हर ओकवर आले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मला काकूला भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे. परंपरा आहे. कुटुंबाला आपण महत्त्व देतो. आजी-आजोबा, आई-वडील आणि काका-काकूंनी आम्हाला पवार कुटुंबीयांची परंपरा शिकवली आहे. त्यामुळे काकींना भेटलो. अर्धा तास भेटलो. तब्येतीची विचारपूस केली. खुशाली विचारली. यावेळी सिल्व्हर ओकवर राजकीय चर्चा झाली नाही. पण शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शिक्षणाबाबतचं एक पत्र दिलं. एक पत्र फडणवीस यांना दिलं. एक पत्र मलाही दिलं. पत्र आल्या आल्या मी कालच अधिकाऱ्यांना सांगितलं. शिक्षण विभागाला माहिती घ्यायला सांगितलं आहे. मला सोमवारी माहिती मिळेल. 2021-22 बाबतच्या निर्णया संदर्भातील पत्र आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर…भेटीत शरद पवारांनी दिले पत्र..
- Advertisement -