Wednesday, April 30, 2025

अमित शाह अन् अजित पवारांची दिल्लीत भेट,अजित पवार म्हणाले…

डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० नोव्हेंबरला दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. पण, तक्रार करण्यासाठी करण्यासाठी अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतल्याची टीका विरोधकांनी केली. यावर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
“दिवाळीआधी मला डेंग्यू झाला होता. पण, मला राजकीय आजार झाल्याचं वृत्त माध्यमांनी चालवलं. याचं वाईट वाटलं. तसेच, अमित शाहांकडे कुणाचाही तक्रार केली नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने १५ दिवस आजारी होतो. पण, वृत्तपत्रे आणि माध्यमांमध्ये राजकीय आजार झाल्याचं सांगितलं गेलं. याचं मला वाईट वाटलं. मी लेचापेचा माणूस नाही. गेली ३२ वर्षे माझी मते स्पष्ट मांडतोय. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही.”

“तसेच, तक्रार करण्यासाठी अमित शाहांनी भेट घेतल्याचं बोललं गेलं. मात्र, तक्रार करणं माझ्या स्वभावात नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करत असतो. तीच पद्धत पुढं चालवली गेली पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles