धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. पडळकरांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं.
“राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अशा विधानावर मत व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्यावर कामावर लक्ष देतो,” अशा शब्दांत अजितदादांनी पडळकरांवर बोलणं टाळलं.
अजित पवार म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत काय त्रुटी राहिल्या याच्यावर चर्चा करण्यात येत आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याचा विचार सुरू आहे,”