राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच, बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली आहे. यानंतर एक कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
“आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात बघायचं कुठल्या, कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचं नाव नसेल, तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला ४२ कोटी रूपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं,” असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला.