लोकसभा निवडणूकीत बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे निवडून आल्या. लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत ज्यानंतर अजित पवार यांनी एक मोठी कबुली दिली आहे. लोकसभेला झालेली चूक अजित पवारांनी मान्य केली आहे.
जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना अजित पवारांनी ही आश्चर्यकारक कबुली देत आपली चूक मान्य केली आहे.
सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ‘