एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले आहेत. एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.”, असं अजित पवार म्हणाले.