राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे खासदारकीसाठी उत्सुक आहेत. मात्र महायुतीमध्ये विखेंना उमेदवारी मिळाल्याने लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. त्यावर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली तर निलेश लंकेला आमदारकी सोडावी लागेल. असं म्हणत लंके यांना थेट इशारा दिला आहे.
निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याने वेगळा निर्णय घेऊ नये असे माझी त्याला विनंती आणि आवाहन आहे. त्याची माझी कालच भेट झाली. मात्र तसा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला आमदारकी सोडावी लागेल. नाहीतर तो अपात्र होईल. तसेच कायद्यानुसार अशा प्रकारे पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास पक्ष कारवाई करू शकतो. असा इशारा यावेळी अजित पवार यांनी निलेश लंके यांना दिला आहे.
लंकेंना मी पक्षात घेतले होते. आता त्यांच्या डोक्यात काही जणांनी खासदारकी भरवली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.