‘शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीजकंपनी तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे धोरण इतर राज्यांनी राबवावे अशा सूचना केल्या आहेत’, अशी माहिती उपमुख्यमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.