भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री ते राज्यातील गेलेली सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. यामुळे अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा योग्य उमेदवार मानले जात आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदींसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते.
फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवाय फडणवीस संघााचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. तसेच आरएसएस आणि भाजपत अध्यक्ष पदावरून मतभेद होते. मात्र फडणवीसांच्या नावावर दोन्ही गट सहमत होताना दिसत आहेत.https://x.com/Dev_Fadnavis/status/1817586171276661015