उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत बारामतीच्या उमेदवारी बाबत मोठा खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना दिलेल्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय सर्वस्वी त्यांनी घेतला असून भाजपने त्यात हस्तक्षेप केलेला नाही. बारामतीतूनही पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अजित पवार यांनीच घेतलेला आहे. आम्ही ही जागा लढणार होतो आणि हर्षवर्धन पाटील यांना तयारी करण्यासही सांगितले होते. पण या जागेची मागणी अजित पवार यांनी केली. त्यांची मागणी नैसर्गिक असल्याने भाजपने ती मान्य केली. पण उमेदवार कोण असावा, हे आम्ही सांगितले नव्हते. पवार यांच्या घरात आम्ही भांडणे लावली नाहीत. वास्तविक शरद पवार हे फोडाफोडीत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक पक्ष व घरे फोडली. मात्र तसे केल्यावर त्यांना ‘ चाणक्य ’ असे संबोधले गेले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बारामतीत भाजपचा उमेदवार तयार होता, अजित पवार आल्यावर जागा त्यांना दिली… फडणवीस यांचा मोठा खुलासा
- Advertisement -