Wednesday, April 17, 2024

फडणवीस म्हणाले, भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यांना काहीही मिळणार नाही

तप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कामाचा झंझावात पाहून इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाबरोबर येऊन काम करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. अशोक चव्हाण असतील किंवा इतर राज्यातील काही नेते असतील, ते सर्व मुख्य प्रवाहात येऊन काम करण्यास इच्छूक आहेत. असे जे नेते भाजपात प्रवेश करत आहेत, त्यांना आम्ही सामावून घेत आहोत”, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली. काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना पद, प्रतिष्ठा मिळत असताना भाजपाच्या मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांना जमिनीवर केवळ संघर्षच करावा लागणार का? असा प्रश्न मुलाखतीत फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “भाजपाचा कार्यकर्ता हाच भाजपाचा आधार आहे. तोच भाजपाची खरी ताकद आहे. भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना माहिती आहे की, त्यांना जीवनात काहीही अक्षरशः काहीही मिळणार नाही. ते आमदार बनणार नाहीत किंवा लोकप्रतिनिधी होणार नाहीत. कारण लोकप्रतिनिधींची संख्या मर्यादीत आहे. तरीही भाजपाचा कार्यकर्ता काम करत राहतो. कारण त्याची काम करण्याची प्रेरणा सत्ता नसून विचार आहे. या कार्यकर्त्याच्या बळावरच भाजपा पक्ष पुढे जात आहे.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles