धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. यानंतर अजित पवार गटाकडून पडळकर यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत होते. यावर आता राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.”