उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गट सत्तेत का आला? याचं उत्तर दिलं आहे. तसंच अजित पवार गटाला भाजपाने आणि शिंदे गटाने का बरोबर घेतलं? याचंही उत्तर दिलं आहे.
सरकार निश्चितपणे स्थिर होतंच. पण राजकारणात शक्ती वाढवावीच लागते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी कुणी बरोबर येत असेल तर त्यांना का घेऊ नये? मी यापूर्वीही सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याकडे २०१९ ला ही येणारच होती. स्थिर सरकार आणि काम करणारं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होऊ शकत नाही ते भाजपाबरोबरच होऊ शकतं ही मानसिकता राष्ट्रवादीची होतीच. त्यामुळे त्यांना यायचं होतं. त्यांनी यायचा प्रस्ताव दिला आम्हाला तो योग्य वाटला आम्ही स्वीकारला आणि त्यांना बरोबर घेतलं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनाच आमच्या बरोबर यायचं होतं, त्यांनीच प्रस्ताव दिला… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा ..
- Advertisement -