उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. मविआचे हे सगळं आंदोलन म्हणजे देखावा आहे असं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच काँग्रेस माफी मागणार का? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? काँग्रेसने सातत्याने शिवरायांचा अपमान केला. आधी त्यांनी देशाची आणि जगभरात जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागितली पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.