मनोज जरांगे पाटील यांना खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फूस आहे, असा अप्रत्यक्ष आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मनोज जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत, तीच स्क्रिप्ट याआधी उद्धव ठाकरे बोलत होते. ज्या स्क्रिप्टवर शरद पवार बोलत होते, नेमके तेच विषय मनोज जरांगे मांडत आहेत. त्यांनी हेच विषय का मांडावेत असा प्रश्न मला पडला आहे. याच कारणामुळ जरांगेंच्या पाठीशी कोण आहे, याची काहीशी कल्पना आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती बाहेर येईल. तुर्तास एवढंच आहे की कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.