राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुधवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी शासकीय बैठका घेतल्या. दरम्यान हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मोठी गर्दी असताना फडणवीस यांनी कर्डिले यांच्याशी संवाद साधला. कर्डिलेंच्या कानात फडणवीस काही तरी सांगत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाली आहत.त्यामुळे जिल्ह्याचा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी कर्डिले यांना नेमका काय कानमंत्र दिला याविषयी चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री कर्डिलेंशी काय गुफ्तगू करतायत? त्या फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा
- Advertisement -