श्रीगोंदा तालुका खांडगाव येथे तरसचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला
वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी – मा. जि. प. सदस्य सचिन जगताप
नगर : श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी चंपालाल यल्लाप्पा कुऱ्हाडे यांच्या वस्तीवर सकाळी ८ वाजता दोन तरसाने जीवघेणा हल्ला केला असून ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आहे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे, भर दिवसा नागरी वसाहतीमध्ये हिंसक प्राणी येऊन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत आहे, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंपालाल कुऱ्हाडे यांचा जीव वाचला आहे नागरिकांनी देखील तरसावर हल्ला केल्यामुळे चंपालाल कुऱ्हाडे यांना सोडून दिले तरी देखील सुमारे तीनशे चारशे नागरिक असून देखील दोन तरस घाबरायला तयार नाहीत तरी वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी वन विभागाकडे केली