Monday, March 4, 2024

शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला घटना समोर आलीये. या हल्ल्यात शनिशिंगणापूर देवस्थानचे सुरक्षारक्षक संदीप दरंदले हे गंभीर जखमी झालेत. रोडवर गाडी उभा न करता पार्किंग मध्ये गाडी उभा करा असे सांगितल्याने धारदार शास्त्राने सुरक्षा रक्षक संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. त्यानंतर आरोपी हा फरार झाला. देवस्थानच्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाते. त्याची सूचना संदीप यांनी संबंधित व्यक्तीला दिली. परंतु त्या व्यक्तीने संदीप यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर कामगारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा देखील दिलाय.

संदीप हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. दरम्यान संध्या संदीप यांच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये संदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.शनिशिंगणापूर मध्ये आलेल्या भक्तांना आपल्या दुकानात पूजा साहित्य घेण्यासाठी आग्रह करणारे लटकू आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वाद होत असतात. त्यांच्याच एका एजंटने सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची माहिती समोर आलीये. सुरक्षारक्षकवर हल्ला करणाऱ्या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles