Saturday, January 25, 2025

राज्यातील भाजपच्या बड्या नेताला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

महयुतीचे समन्वयक आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आमदार प्रसाद लाड यांना या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घ्यावं तसेच त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं प्रसाद लाड यांना धमकी दिली आहे, तसेच त्यांना शिविगाळ देखील करण्यात आली. या प्रकरणात प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या या व्यक्तीनं पुन्हा एकदा लाड यांना जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेनं असं या धमकीत म्हटलं आहे. तसेच ज्याने प्रसाद लाड यांना धमकी दिली तो आरोपी कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंच्या कार्यालयातून बोलत असल्याचं तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. प्रकरण गंभीर असून सदर व्यक्तीची कसून चौकशी करावी, त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles