Thursday, May 22, 2025

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन

महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यादरम्यानच मोदी यांना धमकी देणारा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केला आहे. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलाय. शितल चव्हाण असे फोन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles