सध्या एका लग्नातील व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे नवरदेवाची हटके एन्ट्री.लग्नात हटके एन्ट्री करण्याची क्रेझ सध्या पाहायला मिळते. यासाठी नवरा- नवरीच्या गाड्यांची फुलांनी खास सजावटही केलेली असते. मात्र या व्हायरल व्हिडिओमधील नवरदेवाची गाडी फुलांनी नव्हेतर दुकानातील वेफर्स, कुरकुऱ्यांच्या पुड्यांनी सजवल्याचे दिसत आहे. अशा हटके पद्धतीने लग्नाची गाडी सजवल्याचे याआधी तुम्ही कधी पाहिले नसेल.
https://www.instagram.com/reel/C3CCkd-PgGM/?utm_source=ig_embed&ig_rid=57ee377b-827e-477d-83e8-ddc82bd8c7d2