शिवसेनेचे मंत्री आणि नेते दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे आघाडी तोडायला तयार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचं दिल्लीमध्ये बोलणं होणार होतं. त्यांची युती होणार होती. मात्र संजय राऊत यांनीच हे शरद पवार आणि अजित पवार यांना जाऊन सांगितलं. मग आता तुम्हीच सांगा खलनायक कोण आहे ते? एकनाथ शिंदे दुसरं काहीही मागत नव्हते, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपण भाजपसोबत जाऊ असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.
मोठा गौप्यस्फोट.. उद्धव ठाकरे ‘मविआ’शी काडीमोड घेण्यास तयार झाले होते…
- Advertisement -