Saturday, January 18, 2025

अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंची बदनामी, दोघांविरुद्ध गून्हा दाखल

विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी राष्ट्रवादीचे षडयंत्र, काँग्रेसचा आरोप

प्रतिनिधी : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले, खंडणी मागितली, अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकीटं घेतले, असे म्हणत बदनामी केल्या प्रकरणी इसम नामे प्रवीण शरद गीते, रा. विखे पाटील फाउंडेशन समोर निंबळक, ता. नगर, सागर चाबुकस्वार, रा. भिंगार, सुरज गुंजाळ, रा. बोल्हेगाव यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे काळे यांच्या फिर्यादीवरून कलम १५५ फौजदारी दंड संहिते अंतर्गत भादवि ५०० प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक ९४/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण काळे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, प्रवीण गीते याने म्हटले आहे की किरण काळे एका सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत होते. काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी सर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी काळे यांनी एका मटका अड्ड्यावर स्टिंग ऑपरेशन केले. काळे यांनी अवैध धंदे करणाऱ्यां कडून पाकीटं घेऊन आपले शौक पुरे केले. काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजकांना विविध प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागितले, असे म्हणत काळे यांची बदनामी केली. तसेच प्रसिद्धीपत्रक जारी करत काळे यांचा एखाद्या अवैध व्यावसायिकाला टारगेट करून बाकीच्या अवैध व्यावसायिकांकडून पाकीटं चालू करून खाजगी शौक पूर्ण करून घेण्याचा व्यवसाय आहे, असे म्हणत किरण काळे यांची बिनबुडाची, धादांत खोटी नाटी वक्तव्य करून प्रवीण गीते याने नाहक बदनामी करत प्रतिमा मलीन केली. काळे यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांनी गीतेसह चाबुकस्वार, गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,

काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, त्यानंतर काँग्रेस पक्षातील गद्दार,फुटीर यांना पुढे करून सातत्याने षडयंत्र रचले जात आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी प्रश्नांवरती सातत्याने आंदोलने सुरू आहेत. ७७८ रस्त्यांच्या कामां मधील सुमारे २०० कोटींचा घोटाळा काँग्रेसने बाहेर काढला आहे. कामगार, व्यापारी, उद्योजक, युवकांचे प्रश्न घेऊन ते लढत आहेत. या विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटविण्यासाठी दररोज त्यांच्यावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची, आरोप करून चारित्र्य हनन करण्याची मालिका सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी कडून सुरु आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे षडयंत्र शहर काँग्रेस हाणून पाडेल. शहर विकाससाठी आणि शहरातील राजकीय गुन्हेगारी, दहशतीचा समूळ नायनाट करण्यासाठी याही पेक्षा तीव्र लढा शहरात काँग्रेसच्या वतीने उभा केला जाईल, असे उबाळे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles