Sunday, July 21, 2024

केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचा प्रस्ताव फेटाळला…. उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार…

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी काल (मंगळवारी) दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव अमान्य केल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा पराभव झाला असला, तरी राज्यातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, असं पियूष गोयल यांनी सांगितलं. तसेच आगामी विधानसभा आम्ही आणखी जोमाने लढू असेही ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles