दिल्लीजवळच्या नजफगडमधल्या द्वारका परिसरातील एका सलूनमध्ये शुक्रवारी (९ फेब्रुवारी) धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतंय की, दोन बंदूकधारी इसम सलूनमध्ये घुसले. त्यापैकी एका इसमाने सलूनमधील एका व्यक्तीला जवळून गोळ्या घातल्या. ती व्यक्ती बंदूकधारी इमसमाकडे विनवणी करत होती. जीवे मारू नये यासाठी हात जोडत होती. त्याचवेळी त्या बंदूकधारी इसमाने जीवाची भीक मागणाऱ्या व्यक्तीला गोळ्या घातल्या. द्वारका येथील पोलीस उपायुक्त अंकित सिंह यांनी सांगितलं की, नजफगड पोलीस ठाण्यातील पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनवर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, इंद्रा पार्क, पिलार नंबर ८० च्या समोर एका सलूनमध्ये गोळीबार झाला आहे. यासह मोहन गार्डन पोलीस ठाण्यातही असाच फोन आला होता. या फोनवर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, गोळी लागून जखमी झालेल्या दोन इसमांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोन्ही व्यक्तींची नावं आशिष आणि सोनू अशी होती. उपचारांदरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला आहे.https://x.com/AkshayChorge1/status/1756212978892816561?s=20
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या…CCTV VIDEO
- Advertisement -