नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर शिक्षणावरून जहरी टीका केली आहे. दिल्लीतल्या मुख्यमंत्री निवासस्थानाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु आहे. चौकशीवरून विरोधकांनी केजरीवालांवर टिका करण्यास सुरवात केली आहे. केजरीवालांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
केजरीवाल म्हणाले, “या चौकशीतूनही काहीच निष्पन्न होणार नाही. यापूर्वीही चौकशी झालीय त्यात काहीही मिळालं नाही आत्ताही काही मिळणार नाही. चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार? चोवीस तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात किंवा भाषणं करतात. यांना इतर काही कामं नाहीत,”
पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, सीबीआय मार्फत अशा प्रकारे चौकशी होणं हे पंतप्रधान मोदींची भीती दर्शवणारं आहे विरोधकांनी केजरीवाल सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी आता नवी चौकशी सुरु केली आहे. चौकशीचं मी स्वागत करतो. चौथी पास राजाला माझं एक आव्हान आहे जर मागच्या वेळप्रमाणे यावेळीही काहीही निष्पन्न झालं नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? असा थेट आव्हान केजरीवालांनी मोदींना दिलं आहे.