जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकरी अधिकारी जयंत देशमुख यांना निवेदन.
जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्ता पानसरे यांच्यावर कारवाई करा – शाखा अधिकारी रामदास सकट
नगर – अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडवळी या शखेत शाखाधिकारी म्हणून काम करत असताना मला शाखाधिकारी हे पद नको म्हणत असताना बँके चे माजी संचालक श्री.दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे व माजी विकास अधिकारी श्री भारत इथापे यांनी बळजबरीने मला ह्या पदावर काम करण्यास भाग पाडले व माझ्या कडून खोटे काम करून घेण्यास भाग पाडले. मी असे काम करण्यास नकार दिला होता. परंतु मला माजी संचालक यांनी मला जातीवाचक शिवीगाळ व दहशत करत माझ्या कडून खोटे कामे करून घेत. चांडेश्वर वी. का. सेवा सोसायटी चांडगाव ह्या संस्थेच्या संस्था प्रमुख सचिव व लोकल सचिव यांनी ही रक्कम घेतली होती. ती रक्कम बँकेच्या व्याज सहित भरणा केली आहे. सदरच्या रकमेचा भरणा संस्थेचे चेअरमन सचिव यांनी स्वतः चलन भरून स्वतःच्या सहिने भरणा केलेली चलणे बँकेत आहेत. बँकेचा संपूर्ण भरणा झालेला आहे. तरी बँकने माझा ६/११/२०२३ चा पगार देऊन बँकेच्या सेवेत घेण्यात येऊन खालील रकमा पेंडिंग ठेवलेल्या आहेत. त्या रकमा मला ताबडतोब द्याव्यात व संभदित माजी संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी बँकेचे मुख्य कार्यकरी अधिकारी जयंत देशमुख यांना निवदनाद्वारे दिली असून येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा माजी शाखा अधिकारी रामदास सकट यांनी दिला.
यावेळी मीनाक्षी सकट, नामदेव चांदणे, नानासाहेब तोरडे, सुनील उमाप, अशोक भोसले, सुनील सकट, हिराबाई गोरखे, दत्तू गोरखे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, पोपट गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, वसंत सकट, संतोष साळवे, संपत कुचेकर, धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी रामदास सकट यांनी गेल्या 30 वर्षापासून बँकेची प्रामाणिक सेवा केले असून बँकेचे माजी संचालक दत्ता पानसरे यांनी बळजबरीने चांडेश्वरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चांडगाव या संस्थेला बोगस कर्ज देण्यास भाग पाडले त्यामुळे रामदास सकट यांच्यावर कारवाई झाली खरी कारवाई तर संचालकांवर होणे अपेक्षित होते ते न होता शाखाधिकार्यावर कारवाई झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक सहकार खात्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली असून शाखाधिकारी यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. तरी येत्या आठ दिवसात त्यांना कामावर घेऊन त्यांची नियमानुसार सर्व रक्कम द्यावी अशी मागणी बापू गायकवाड यांनी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाकळी कडवळी या शाखेतील शाखा अधिकार्यावर झालेल्या कारवाई बाबतची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना दिली असून त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नका या प्रकरणाची माहिती घेऊन तुम्हाला न्याय दिला जाईल अशी माहिती सुनील उमाप यांनी दिली.