लष्करी हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- लष्कर हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळावी या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांना निवेदन देउन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत सय्यद शफी आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अ नगर शहरात फार मोठ्या प्रमाणावर लष्करी हद्द आहे पूर्वी ती लष्कर हद्द शहराबाहेर होती परंतु आता शहर हद्दीकरण व लोकसंख्या वाढल्याने लष्कर हद्द ही लोकवस्तीच्या आत आली आहे व आता लष्कराने काही वर्षांपूर्वी लष्कर हद्दीपासून १०० मीटर अंतरापर्यंत नवीन बांधकाम घर परवाने व दुरुस्ती करण्यास मनाई केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत व महापालिका हद्दीतील नागरिकांना लष्कर हद्दीपासून १०० मीटर पर्यंत नवीन बांधकाम परवाने देत नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे कारण माणूस हा आपल्या आयुष्यभराची कमाई एकत्रित करून जागा घेतो घर बांधण्याचे स्वप्न पाहत असतो त्यामध्ये असे काही अडचणी आल्यास त्यापुढे हदबळ होण्याशिवाय कोणतेही पर्याय उरत नाही तरी सामान्य नागरिक जे लष्कर हद्दीच्या १०० मीटर आत राहत आहे किंवा प्लॉट घेतलेला आहे अशा लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर १०० मीटरची अट रद्द करून मध्यमवर्गीय कुटुंबीयाना न्याय दावा व लष्कराचे संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांची एक संयुक्त बैठकीत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा व लष्कराने ही मागणी मान्य केली नाही तर खासदार निलेश लंके यांच्यामार्फत संसदेमध्ये प्रश्न मांडून मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लष्करी हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळण्याची मागणी
- Advertisement -