Thursday, July 25, 2024

अब्दुल सत्तार यांनी युतीधर्म पाळला नाही, मंत्रिमंडळातून सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंचा तब्बल १ लाख मताधिक्यांनी पराभव केलाय. दरम्यान, या दानवे यांच्या या पराभवाला मंत्री अब्दुल सत्तार हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात काम केले. त्यांनी निवडणुकीत युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे सिल्लोड तालुका शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. यासंदर्भात कटारिया यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहलं आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“नुकत्याच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्यात त्यात आपल्या पक्षाची सत्ता आली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधानपदी विराजित झाले. त्यांच्या विजयात बाम्हाला अपेक्षित वाटा उचलता आला नाही याची सल मनात आहे. कारण आमच्या लोकसभा मतदारसंघात आम्हाला अपेक्षित मत मिळवून देता आली नाही”, असं कटारिया यांनी म्हटलं आहे.

“एकगठ्ठा मुस्लिम मते, आरक्षणाच्या विषयावरून नाराजी या सोबतच सिल्लोड विधानसभा मतदार संघात एक अजून कारण म्हणजे महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधात केलेले काम. निवडणुकीच्या काळात दोन अगोदर पासून अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस उमेदवाराचे उघड-उघड काम केले”, असा आरोप कटारिया यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles