Wednesday, April 17, 2024

अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे निलंबन तत्काळ रद्द करण्याची मागणी,राजकीय मतभेदामुळे अधिकाऱ्यांचा बळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांना माजी मंत्री राम शिंदे यांनी माहिती मागितली असता माहिती दिली व बुधवारी होणारी टंचाई मीटिंग सोमवारी बोलावून अभियंता किरण देशमुख खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप करत त्यांचे निलंबन करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना त्यांचा प्रस्ताव मागून तो पालकमंत्री यांना सादर करण्यास भाग पाडले असल्याने अभियंता किरण देशमुख यांच्या निलंबनाचे प्रस्ताव तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा अध्यक्ष अजित भोसले, किसन चव्हाण, घोटवी सरपंच अविनाश चव्हाण, अमोल भोसले, राहुल भोसले, नवनाथ भोसले, रामसिंग भोसले आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, कुकडी, पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत घोड, कुकडी, विसापूर, सीना धरणाचे कार्यक्षेत्र येते वरील सर्व धरणाचे खरीप आणि रब्बी चे आवर्तन यशस्वीपणे पार पडलेली आहे. तरीही जाणून-बुजून मागासवर्गीय आदिवासी समाजातील अभियंता देशमुख यांना त्रास देण्याच्या हेतूने माजी मंत्री राम शिंदे यांनी निलंबनाची कार्यवाहीसाठी अग्रधरला आहे. अशा निष्पाप अधिकाऱ्यावर अन्याय होत असून केवळ हा अन्याय राजकीय मतभेदामुळे अधिकाऱ्याचा बळी घेण्याचा षडयंत्र चालू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार रोहित पवार यांचे ऐकून पाणी सोडण्यास विलंब करीत आहे. असा माजी आमदार राम शिंदे यांचा गैरसमज झालेला असून अभियंता देशमुख यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. व पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभियंता यांचे निलंबनाचे प्रस्तावतात तात्काळ रद्द करण्यात यावे व आदिवासी असल्याने त्यांच्यावर जाणून बुजून खोटे आरोप केले जातात व पाणी न सोडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभियंता यांच्या विरोधात उपोषणाला बसू अशी धमकी माजी. आमदार राम शिंदे देत आहे. त्यामुळे निलंबन रद्द न झाल्यास श्रीगोंदा, पारनेर, जामखेड, कर्जत मधील आदिवासी दलित भटके विमुक्त यांच्या वतीने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ फेब्रुवारीला अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles