Sunday, December 8, 2024

अहमदनगरमध्ये केमिकलचे दूध……भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर-शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये गेली कित्येक दिवसापासून राजरोसपणे केमिकल युक्त दूध भेसळ असलेले दूध विकले जात आहे. शहरांमधील सर्व दुकानांमध्ये तसेच छोट्या दूध डेअरीमध्ये राजरोसपणे केमिकल युक्त भेसळ दूध विकले जात असून व तसेच शहराच्या लगत असणाऱ्या खेड्यापाड्यातून आलेल्या दूध वाल्यांकडून दूध घेऊन भेसळ करून ते विक्री केली जाते.

शहरामध्ये दुधाचे पिण्याचे प्रमाण हे छोटी मुले, वृद्ध लोक हेच आहे. वयोवृद्ध व लहान मुले दूध पिऊन आजारी पडत आहे. संबंधित खात्याचे मंत्री वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. सर्वांचे आर्थिक हितसंबंध असल्याने शंका निर्माण होत आहे. हे भेसळयुक्त दूध तयार करून लहान मुला मुलींना त्यांच्या कुटुंबीयांना विषारी दूध पाजत आहे तरी या दूध भेसळी बाजारावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे पाटील हे उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles