Sunday, July 21, 2024

नगर जिल्हा परिषदेत बदलीसाठी चुकीचे प्रमाणपत्र, दोन महिला कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी

अहमदनगर जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेसाठी सादर केलेली प्रमाणपत्रे चुकीची आढळल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन महिला
कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. सुजाता धामणे या शिक्षिकेने सोलापूर जिल्हा परिषदेतून अहमदनगर जिल्हा परिषदेत बदली
मिळविण्यासाठी सादर केलेले प्रमाणपत्र चुकीचे असल्याची तक्रार स्मिता होले यांनी केली होती.

याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे.त्यानुसार दोषारोपपत्र निश्चित करून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.दुसऱ्या प्रकरणात जलसंधारण विभागात श्रीगोंदा पंचायत समितीत कार्यरत असणाऱ्या एस. बी. दाळिंद्रे या महिलेने बदली टाळण्यासाठी सादर केलेले प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे आढळले आहे. दाळिंद्रे यांना ज्या चुकीच्या बदल्यांसाठी चुकीची प्रमाणपत्रे देऊन लाभ मिळवू नका, असे आवाहन आपण गतवर्षीच केले आहे. ज्या कर्मचायांची प्रमाणपत्रे चुकीची आढळतील त्यांच्याविरुध प्रशासन कडक कारवाई करणार आहे. यावर्षीच्या प्रस्तावित बदल्यांनाही हेच तत्त्व लागू राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी

अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. यंत्रणेने प्रमाणपत्र दिले होते त्यांनीच ते रद्द केले आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र चुकीचे होते, हेही स्पष्ट झाले आहे.
सदर महिला कर्मचाऱ्याचीही खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश येरेकर यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles