Sunday, December 8, 2024

जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा आढावा ,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

अहमदनगर जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना*

अहमदनगर, – महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे अहमदनगर दौऱ्यावर असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला.

लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा अशा सूचना त्यांनी केल्या. डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबतदेखील सहमती दर्शवली. यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.

अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती श्री.ओला यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील त्याचा उपयोग व्हावा यादृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
नगर जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा आढावा उपसभापती गोर्‍हे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून घेतला. भरोसा सेल प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारणे शक्य नसल्याने महिन्यातून एक दिवस प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून महिलांच्या ऑनलाइन तक्रारी नोंदून घ्याव्यात, जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्यात जागा उपलब्ध आहे तेथे बालस्नेह पोलीस कक्ष सुरू करावे. जेणे करून लहान मुलांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर दबाव येतो. त्यांना बोलता येत नाही. अशावेळी शाळेचे वातावरण असलेल्या बालस्नेह पोलीस कक्षात मुलांना कोणाच्या दबावाशिवाय मनमोकळे बोलता येईल. तक्रार करता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच नवीन कायद्याची माहिती सर्वांना मिळावी या दृष्टीने प्रचार व जनजागृती करण्याच्या सुचना अधीक्षक ओला यांना केल्या असल्याचे उपसभापती गोर्‍हे यांनी सांगितले.

नवीन दंडसहिंतेसंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षण व जागृती करण्यात यावी,
अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles