खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर…

0
31

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप शपथविधी अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांच वाटप करण्यात आलं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. आज मंगळवारी सकाळपासूनच मंत्रालयात बैठकांचा धडाका लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. अजित पवार यांनी सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक घेतली. यापूर्वी हे खातं शंभूराजे देसाई यांच्याकडे होतं. आता अजित पवारांकडे हे खाता आल्यानंतर खात्याच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडे खात्याचा आढावा घेतला. यानंतर ते अर्थ खात्याची बैठक घेणार आहेत.

शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता महायुती सरकार राज्यकारभाराला लागलं आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदाभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेत दोन्ही खात्यांचा आढावा घेतला. दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ आपापल्या खात्याचा पदाभर स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत.