Saturday, December 9, 2023

वा रे पठ्ठ्या! पत्नीसाठी केला अनोखा जूगाड…..या जोडप्यांचा व्हिडीओ ..

सणासुदीच्या काळास बाहेर गावी जाण्यासाठी बस, ट्रेन असो रस्तेमार्गावर प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येते. या दरम्यान गर्दीतून बस आणि ट्रेनमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते. कधी कधी कन्फर्म तिकीट असूनही अनेकांना ट्रेन तसंच बसमध्ये चढता येत नाही. पण काही महान लोक असे असतात की प्रंचड गर्दीमधून क्षक्कल लढवून स्वत: साठी जागा मिळवतात. अशातच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी एका जोडप्याने काय केले आहे तुम्ही नक्की पहा. या जोडप्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लाल रंगाची बस उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तिथं बाहेर उभी असलेली महिला स्वत:ची चप्पल काढते आणि बसमध्ये आधीपासून जाऊन बसलेल्या व्यक्तीला देते. यानंतर त्या महिलेचा हात पकडूनल ती व्यक्ती तिला बसच्या खिडकीतून बसमध्ये खेचते. तिला खिडकीतून आतमध्ये खेचत असताना सुरुवातीस तिचा पाय सरकतो पण ती बसमध्ये जाण्यात यशस्वी होते. बसस्थानकात इतर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. बसच्या दरवाजात बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d