निलंबनाचे आदेश आले तरी घेतली लाच; सहदुय्यम निबंधकाच्या घरातून सव्वा कोटींची रोकड जप्त
सिल्लोड : भावजयीच्या नावावर असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच तक्रादाराकडून स्वीकारताना येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील (वय ४९ वर्षे) यांच्यासह दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवार, १ मार्च रोजी करण्यात आली. पाटील यांच्यासह स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात (वय ५८ वर्षे) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर एसीबीने पाटीलच्या घराची झडती घेतली असता तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे