नगर : बदलत्या काळाप्रमाणे शहराच्या विकासाचे पुढील 50 वर्षाचे नियोजन करून व दूरदृष्टी ठेवून विकासाचे कामे हाती घेतली असून विकसित शहर निर्माण करायचे आहे, बुरुडगाव हे नगर शहर विधानसभा मतदार संघात असून या गावच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठा निधी प्राप्त करून दिला असल्यामुळे गावाला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे, विकासाची एकदा केलेली कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचे नियोजन केले जाते, नाही तर यामध्येच नगरसेवक, सरपंच, सदस्य यांना अडकून पडावे लागते, नागरिकांचे तेच तेच प्रश्न सोडवण्यात वेळ जातो, विकास कामांचा पाठपुरावा झाला पाहिजे, त्या माध्यमातून विकास कामांवरच चर्चा होत असते, बुरुडगावचा दळणवळणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावला आहे. भिंगारनाला व सिना नदीवरील पुलाचे काम मार्गी लावले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले,
बुरुडगाव येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नतून विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, विशाल पवार, सरपंच अर्चना कुलट, उपसरपंच महेश निमसे, ग्रामपंचायत सदस्य खंडू काळे, रवींद्र ढमढेरे, अक्षय चव्हाण, दिनेश शेळके, राहुल बोरुडे, ग्रामसेवक शेळके, अभियंता चव्हाण , बापूसाहेब कुलट, सोमनाथ तांबे, राधाकिसन कुलट, नवनाथ वाघ, भागिनाथ कदम, यशवंत कदम, संभाजी धामणे, विश्वजीत शिंदे, बाळासाहेब जाधव, जालिंदर कुलट, आप्पासाहेब कुलट, ईश्वर कुलट, बाळासाहेब कुलट,अंकुश काळे, भाऊ ससाणे, संभाजी साबळे, नितीन जाधव, ओंकार साबळे, बबलू साबळे, सोनू साबळे, भाऊ ससाणे, गितेश्वर शिंदे, सचिन नरसाळे, रोहन टीमकरे, आदित्य बळे, सचिन फुलारे, अविनाश फुलारे, नवनाथ मोकाटे, सुरज ढमढेरे, ज्ञानेश्वर चव्हाण, फारुक शेख, राम चव्हाण, राहुल महाराज,दिनेश कुलट, सोमनाथ जाधव, विशाल टिमकारे, माधुरी निमसे, साक्षी औताडे, सुनिता जरेकर, हिराबाई मोडवे, अश्विनी जाधव, सारिका औताडे , संगीता घोडके, अंबादास गायकवाड, सोनु नरसाळे, बंटी साबळे, मनिषा जेऊघाले, विजय फुगारे, पप्पु साके, प्रवीण मोरे, बापु बोरगे, जमील पठाण, किशोर कर्डिले, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सरपंच अर्चना कुलट म्हणाल्या की, गावाच्या विकासाला गती प्राप्त झाली असून या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठा योगदान लाभले आहे, गेल्या १० वर्षात गावात विकास कामातून बदल झाला असून आता पूर्वीचे बुरुडगाव राहिले नसून विकसित बुरूडगाव निर्माण झाले आहे, बुरूडगावला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागल्याने दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला असे त्या म्हणाल्या. यावेळी उपसरपंच महेश निमसे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले
बुरूडगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला असल्यामुळेच गावाला गावपण आले असून गावातील अंतर्गत २० लाख रुपयांची काँक्रिटीकरण रस्त्याची कामे मार्गी लागली आहे, तसेच पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे, याचबरोबर आझादनगर व गावठाण भागातील अंगणवाडी बांधकामसाठी प्रत्येकी सुमारे १२ लाख रुपये, २ शाळा खोल्या इमारत बांधकाम २५ लाख रुपये, स्मशानभूमी साठी २० लाख रुपये, भूमिगत गटार बांधणे १० लाख रुपये, बुरूडगाव ते कर्डीले वस्ती ते आझादनगर ते दौंड महामार्गपर्यंत रस्ता विकसित करणे यासाठी १ कोटी रुपये, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली
नगर शहर आता भावनेवर चालणारे शहर राहिले नसून विकासावर चर्चा करणारे बनले आहे, पूर्वी आम्ही बुरुडगावमध्ये यायचो तेव्हा या ठिकाणी कोणत्याही विकासाच्या सुविधा न्हवत्या, मात्र गेल्या १० वर्षात आ, संग्राम जगताप यांनी सर्वांगीण विकासातून गती दिली आहे, असे मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी मांडले