राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकाराने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए असल्याचे दोन जणांनी १५ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सोसायटीचे काम करून देण्याच्या नावाखाली आरोपींनी ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी या दोघांची नावे आहेत.
यातील सुहास महाडिक याच्यावर या पूर्वीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या दोघांवर फसवणूक प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात १७०, ४१९, ४२०,३४ भा द वी कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत.