उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. 1999च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत नव्हतं. मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे येत नव्हतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या काळात त्यांनी एक गोष्ट केली. ती म्हणजे नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. याची त्यांनी काळजी घेतली होती. जनहितापेक्षा त्यांना पद महत्त्वाचं वाटत होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला आहे.
लोकसभेच्या जागा वाटपावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत 30 जागा लढवण्याचा आमचा आग्रह होता. पण लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती. त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. पण युतीत आमच्या जागा वाढल्या आहेत. आता आम्ही युतीतील प्रत्येकाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.