महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी होणार आहेत. महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “कुणीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं, स्वप्न पाहणं चूक नाही. राजकारणात अजित पवार हे काही भजन करायला किंवा आमची पालखी उचलायला राजकारणात आलेले नाहीत. त्यांना मनात वाटतं आहे की मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यात काही गैर नाही. मात्र राजकीय वास्तव ही बाबही लक्षात घ्यायला हवी. भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष आजही आहे आणि उद्याही असणार आहे. सर्वात मोठा पक्ष आज आम्ही आहोत आणि विधासभेच्या नंतरही असू. जो निर्णय होईल तो आमचे पक्ष श्रेष्ठी घेतील. त्याआधी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल.” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.